What Is Silent Heart Attack: हॉर्ट अटॅकची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मोठ्यांमध्येच नाही तर हृदयविकाराचा झटका कमी वयातच आल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे अनेकांना कमी वयातच जीव गमवावा लागतो. छातीत दुखणे, घाम येणे, पाठदुखी तसंच श्वास घेण्याचा त्रास होणे ही हार्ट अटॅकची लक्षणं असली तरी कधी-कधी कोणत्याही लक्षणांशिवाय हृदयविकाराचा झटका येवू शकतो. याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. सायलेंट हार्ट अटॅकमुळे मृत्यू देखील होवू शकतो. चला तर जाणून घेऊया सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं कोणती आणि त्यासाठी काय खबरदारी घ्यावी?

- सायलेंट हार्ट अटॅक का येतो? कोणत्याही लक्षणांशिवाय किंवा वेदनांशिवाय होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात, असे प्रसिद्ध इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनिल कृष्णा म्हणतात. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या ब्लॉक होतात तसेच यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाही तेव्हा हृयविकाराचा झटका येतो. सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याच्याही वेगवेगळ्या श्रेणी आहेत. काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, तर काहींना छातीत सौम्य वेदना, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवते.

- कोणाला हा आजार होण्याची शक्यता जास्त असते?: तज्ञांच्या मते, प्रत्येक आजार होण्यापूर्वी त्याची काही लक्षणं जाणवतात. परंतु, हृदयविकाराचा झटका येणे हे फारच दुर्मिळ आहे. डॉ. अनिल कृष्णा यांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांना विशेषतः सायलेंट हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. एनआयएच टीमने केलेल्या संशोधनानुसार कुटुंबातील एखाद्याला ही समस्या असेल तर बाकीच्यांनाही ती होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच अशा लोकांनी सावधगिरी बाळगावी आणि वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी शिफारस केली जाते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना देखील सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हटलं जातं की, धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयींमुळे देखील सायलेंट हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

- सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं
- श्वास घेण्यास त्रास होणे
- हृदय गती वाढणे
- छातीत सौम्य वेदना किंवा अस्वस्थता
- व्यायामादरम्यान वेदना
- विनाकारण घाम येणे
- थकवा
- अपचन
- निद्रानाश
- पोटदुखी, मळमळ
- पडल्यासारखे वाटणे
- फ्लूसारखी लक्षणे
- घ्यावयाची खबरदारी
- संतुलित आहार घ्या आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर रहा.
- व्यायामाची सवय लावा.
- जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर औषधे नियमितपणे घ्यावीत.
- नियमित आरोग्य तपासणी (बीपी, साखर, कोलेस्ट्रॉल) करावी.
- धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी सोडाव्यात.
- तुमचे वजन निरोगी राहील याची खात्री करा.
- नियमीत हृदयाच्या चाचण्या कराव्यात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)