मुंबई Vaibhav Gupta wins Indian Idol : इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत शुभदीप दास चौधरी, अनन्या पाल, आद्या मिश्रा, पीयूष पँवार आणि अंजना पद्मनाभन हे गायक पोहोचले होते. मात्र, त्या सर्वांवर वैभव गुप्तानं मात केली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पीयूषला ५ लाखांचा धनादेश तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अनन्याला ३ लाखांचा धनादेश मिळणार आहे.
सोनू निगमनं इंडियन आयडॉलच्या पहिल्या दोन आणि नवव्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिल होतं. यावेळी त्याला अंतिम फेरीत खास परीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. तर नेहा कक्कर ही आगामी कार्यक्रमात सुपर परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. तीदेखील इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. प्यारेलाल सिम्फनी चॅलेंजमध्ये वैभवनं १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हम या चित्रपटातील 'जुम्मा चुम्मा' हे गाणं गायलं. हम चित्रपटात अमिताभ बच्चन, रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वैभवनं अंतिम फेरीत शेवटचं गाणं हे सोनू निगमबरोबर गायलं.
-
Indian Idol Season 14 ke winner hai Kanpur ke chhote sethji - Vaibhav Gupta!!!🥳🏆@shreyaghoshal @KumarsanuTc @VishalDadlani @fremantle_india #IndianIdol14 #EkAwaazLakhonEhsaas #GrandFinale #Winner #Finalist pic.twitter.com/nUcx10JB25
— sonytv (@SonyTV) March 3, 2024
प्रेक्षकांचे मानले आभार- इंडियन आयडॉलची पहिली ट्रॉफी ही मराठमोळ्या गायक अभिजीत सावंतनं जिंकली होती. विजेते म्हणून निवड झाल्यानंतर वैभव म्हणाला, "अत्यंत प्रिय आणि प्रतिष्ठेचा असलेल्या या कार्यक्रमाची परंपरा पुढे नेत असताना प्रचंड आदर वाटत आहे. हा प्रवास खूप भावनिक चढ-उतारांचा, आव्हानांचा आणि अविस्मरणीय क्षणांचा ठरला आहे." त्यानं आजवरच्या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आणि परीक्षकांचे आभार मानले. आभार व्यक्त करताना वैभव म्हणाला, "मला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्याबद्दल मी खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी मला मतं दिलं. मला प्रोत्साहित केलं. खऱ्या अर्थानं आयडॉल असल्याची भावना करून दिली."
आम्हाला नेहमीच आश्चर्यचकित केलं- कुमान सोनुनं वैभवच्या विजेते पदानंतर प्रतिक्रिया दिली. वैभव ट्रॉफी उचलत असल्याचं पाहू मला अतिशय आनंद झाला. जेव्हा मी पहिल्यांदा वैभवचं सादरीकरण पाहिलं तेव्हाच मला त्याच्यामधील क्षमतेचा अंदाज आला होता. गायिका श्रेया घोषालनंदेखील कुमार सोनूच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. "ऑडीशनला सुरुवात झाल्यापासून वैभवनं स्पर्धेत सादरीकरणात वैविध्य दाखविलं आहे. त्यानं कामगिरीतून आम्हाला नेहमीच आश्चर्यचकित केल्याचं श्रेयानं सांगितलं.
हेही वाचा-