मुंबई : सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सध्या खूप चर्चेत आहे. शोमधील स्पर्धकांना दररोज नवीन टास्क दिले जात आहेत. तसेच या शोमध्ये स्पर्धकांमध्ये वाद देखील पाहायला मिळत आहे. या शोमध्ये मनोरंजनासाठी हलक्याफुलक्या विनोदांचाही वापर केला जात आहे. फराह खानच्या या शोमध्ये शेफ विकास खन्ना आणि रणवीर बरार हे जज म्हणून आहेत.
'या' स्पर्धकाचा प्रवास संपला : एका रिपोर्टनुसार या शोमधून ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या आठवड्यात बाहेर पडल्या आहेत. त्याच्या एलिमिनेशनमुळे फक्त इतर स्पर्धकच नव्हे तर परीक्षक आणि होस्ट फराह खान देखील भावनिक झाली. यापूर्वी दीपिका कक्कर आणि आयशा झुल्का या देखील शोमधून बाहेर पडल्या आहेत. उषा नाडकर्णी यांच्या एलिमिनेशननंतर, आता शोमध्ये टॉप 6 स्पर्धक उरले आहेत. यात गौरव खन्ना, राजीव अदातिया, तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, फैजल शेख आणि निक्की तांबोळी यांचा समावेश आहे. हा शो अधिक रोमांचक बनवण्यासाठी निर्माते नवीन ट्विस्ट आणत आहेत. आता पुढील स्पर्धा खूप कठीण असणार आहे.
'लाफ्टर शेफ' शो टीआरपीमध्ये समोर : सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' टीआरपीच्या शर्यतीत हा शो मागे पडत आहे. रिपोर्ट्सनुसार, 'लाफ्टर शेफ' नावाचा आणखी एक कुकिंग रिअॅलिटी शो सध्या टीआरपी यादीत चांगली कामगिरी करत आहे. या शोला प्रेक्षकांकडून भरभरून मिळवत आहे. दरम्यान उषा नाडकर्णी अनेकदा 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोमध्ये अनेकदा भावूक होताना दिसल्या आहेत. या शोमध्ये त्यांचा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडत होता. आता या शोमधून त्या गेल्यानंतर अनेकजण नाराज आहेत. उषा नाडकर्णी यांना 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेद्वारे घराघरात ओळख मिळाली. आता 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्येही त्यांनी त्याच्या अद्भुत प्रवासानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एलिमिनेशननंतरही चाहते त्यांना खूप प्रेम आणि आदर सोशल मीडियाच्या माध्यामातून देत आहेत. आता येत्या आठवड्यात 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा किताब कोण जिंकेल हे पाहणं मनोरंजक असेल.