मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'सिकंदर' हा या वर्षातील मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे, जो 2025च्या ईदला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आता निर्मात्यांनी 'सिकंदर'चा टीझर रिलीज करून चाहत्यांना खुश केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल सारखे कलाकार दिसणार आहेत. 'गजनी'चे दिग्दर्शक एआर मुरुगदास हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'सिकंदर'च्या टीझरमध्ये सलमान खान लोकांना न्याय देताना दिसत आहे. टीझरमध्ये भाईजान पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर सलमानच्या संवादानं सुरू होतो.
'सिकंदर'चा टीझर रिलीज : या चित्रपटाच्या टीझरमध्ये त्यानं म्हटलं, "माझ्या आजीनं माझे नाव सिकंदर ठेवलं होतं, माझ्या आजोबांनी माझे नाव संजय ठेवलं होतं आणि लोकांनी माझं नाव राजा साहेब ठेवलंय." त्यानंतर एक मोठा स्फोट होतो आणि पार्श्वभूमीतून आवाज येतो, "मी न्याय देण्यासाठी नाही तर साफ करण्यासाठी आलो आहे. 'जर तुम्ही नियमांचे पालन केले तर तुम्हाला फायदा होईल, अन्यथा तुम्हाला स्मशानात जावे लागेल." 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर हा खूप धमाकेदार आहे. या चित्रपटामध्ये सलमानचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय साऊथ अभिनेत्री रश्मिका पहिल्यांदाच सलमानबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट जोरदार असेल सध्या सलमानचे चाहते म्हणताना दिसत आहेत.
'सिकंदर'बद्दल : या चित्रपटाच्या टीझरला सध्या सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'सिकंदर'बद्दल चाहत्यांमध्ये असलेल्या उत्साहाबद्दल मुरुगदास यांनी म्हटलं होतं, "सलमान खानबरोबर काम करणे खूप छान होतं. त्याच्या उर्जेनं आणि समर्पणानं 'सिकंदर'ला जीवन दिलं. साजिद नाडियाडवाला यांचेही खूप खूप आभार. 'सिकंदर'चा प्रत्येक सीन खूप छान रचला आहे. मी प्रत्येक क्षण डिझाइन करण्यासाठी माझे संपूर्ण मन लावले आहे. सलमान खान अभिनीत या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. तसेच आता काही चाहते टीझरच्या पोस्टमध्ये शाहरुख खानकडून कॅमिओची मागणी करत आहेत. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :