मुंबई - Mukesh Chhabra : कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलंय. आता त्यांनी नितीश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाची संपूर्ण कास्टिंग फायनल केली आहे. मुकेश यांनी एका पॉडकास्टमध्ये 'रामायण'बद्दल खुलेपणानं चर्चा करत अनेक खुलासेही केले आहेत. त्यांनी रणबीर कपूरला या चित्रपटात श्रीरामच्या भूमिकेसाठी का निवडले याबद्दल देखील सांगितलं आहे. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना, मुकेश छाबरा यांनी 'रामायण' चित्रपटातील पात्रांबद्दल काही गोष्टी उघडपणे सांगितल्या. याशिवाय त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.
मुकेश छाबरा केलं वादग्रस्त वक्तव्य : या पॉडकास्टमध्ये त्यांनी म्हटलं, "यार रावण देखील प्रेमात पडला होता. त्याला बदला घ्यायचा होता, त्याला त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होते. मला जेवढा रावण समजला आहे, तो दुष्ट आणि प्रतिशोधी होता, परंतु त्याचा बदला हा त्याच्या बहिणीवरील प्रेमानं प्रेरित होता. बहिणीसाठी त्याला असं करावं लागलं. तो त्याच्या बाजूनेही ठीक होता. युद्धात, दोन्ही बाजूंचा विचार केला जातो, कुठला पक्ष योग्य याबद्दल पाहिलं जातं." दरम्यान नितीश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये, केजीएफ अभिनेता यश हा 'रावण'च्या भूमिकेत दिसू शकतो. यश हा खरोखरच रावणाच्या भूमिकेत दिसणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
रणबीर श्रीरामाच्या पात्रासाठी योग्य : मुकेश छाबरानं रणबीरबद्दल विधान करत म्हटलं, "रणबीर 'रामायण'मध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी योग्य निवड आहे." मुकेश यांनी पुढं म्हटलं की,"चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांना हे देखील समजेल की रणबीर कपूरशिवाय इतर कोणताही अभिनेता या भूमिकेत चांगला असूच शकत नाही." या चित्रपटातील लक्ष्मणच्या पात्रासाठी कास्टिंग करणे त्यांच्यासाठी सर्वात कठीण असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.
'रामायण' चित्रपटामधील पात्र : या चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामच्या भूमिकेत तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलची निवड केली गेली आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते मधु मंथेना आणि अल्लू अरविंद आहेत. दरम्यान यापूर्वी 2020 मध्ये सैफ अली खाननं ओम राऊतच्या बिग बजेट चित्रपट 'आदिपुरुष'मध्ये रावणाची भूमिका साकारली होती. यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मात्र 'रामायण'च्या निर्मात्यांना या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.
हेही वाचा :
- 'रामायण'मधील रावणासाठी तयार होणार खऱ्या सोन्याचा पोशाख - nitesh tiwari upcoming film
- 'रामायण'साठी रणबीर कपूरची नवीन हेअरकट, फोटो व्हायरल पहा - ranbir kapoor new haircut
- नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मधील कैकेयीच्या भूमिकेबद्दल केला लारा दत्तानं खुलासा, वाचा सविस्तर - lara breaks silence on kaikeyi role