मुंबई - Janhvi kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही'च्या प्रमोशनसाठी कोणतीही संधी सोडत नाही. गेल्या बुधवारी तिनं आरसीबी विरुद्ध आरआर सामना स्टेडियमवर उपस्थित राहून पाहिला. त्यानंतर तिनं तिचा बीएफएफ ओरी उर्फ ओरहान अवत्रामणीबरोबर पारंपारिक गुजराती थाळीचा आनंद घेतला. आता तिच्या गुजरात दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जान्हवीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या अहमदाबाद ट्रिपची झलक शेअर केली आहे. दरम्यान 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये जान्हवी चाहत्यांबरोबर सेल्फीसाठी पोझ देताना दिसत आहे.
जान्हवी कपूरनं शेअर केले फोटो : याशिवाय तिनं एक अहमदाबादच्या स्टेडिअममधील एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या क्लिप ती हसताना दिसत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममधील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जान्हवी आयपीएल मॅचचा आनंद घेत आहे. विराट कोहलीच्या रनआउटवर जान्हवीनं आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली यानंतर तिची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली. जान्हवीचा आगामी चित्रपट 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हा क्रिकेटवर आधारित आहे. या चित्रपटाच्या रिलीजची चाहते खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत.
जान्हवी कपूरचं वर्कफ्रंट : 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी एका जोडप्याची आहे, जे त्यांच्या क्रिकेटवरील प्रेमानं एकत्र आले आहेत. राजकुमार हा स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जान्हवीला क्रिकेटर बनवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. याआधी राजकुमार राव आणि जान्हवी कपूरही 'रुही'मध्ये एकत्र दिसले होते. दरम्यान जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'देवरा पार्ट 1' चित्रपटामध्ये साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआरबरोबर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. तिचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होईल. याशिवाय ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि 'तख्त' चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :