ETV Bharat / entertainment

हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा पूल व्हिडिओ व्हायरल - hardik pandya and natasa stankovic - HARDIK PANDYA AND NATASA STANKOVIC

Natasa Stankovic : हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर दिसत आहे.

Natasa Stankovic
नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic (IANS photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 7:12 PM IST

मुंबई Natasa Stankovic : सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आता चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यापासून नताशा ही तिचं वेगळं आयुष्य जगत आहे. नताशा आणि हार्दिक 2020 मध्ये एकत्र आले होते. यानंतर जुलै 2024 मध्ये दोघांनी लग्नाच्या चार वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा ही काही दिवसांसाठी सर्बियातील तिच्या घरी गेली. आता ती परतली आहे. आजकाल ती आपला बहुतेक वेळ सर्बियन फिटनेस ट्रेनर आणि मॉडेल अलेक्झांडर ॲलेक्स इलिकबरोबर घालवत आहे. सध्या दोघंही गोव्यात एकत्र आहेत.

नताशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर : रविवारी अलेक्झांडरनं त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तो गोव्यात सुट्टीवर असताना नताशाबरोबर पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आता याचबरोबर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर बरेच लोक असा दावा करत आहेत की, दोघे फक्त चांगले मित्र आहेत. याशिवाय अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलं की, दोघंही एकाच देशातील असून त्यांच्यात काही कौटुंबिक संबंध असण्याची शक्यता आहे. याशिवाय काही चाहते त्याला नताशाचा चुलत भाऊही म्हणत आहेत.

यूजर्सनी दिल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया : सध्या तरी त्यांच्या नात्याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. यावर दोघेही मौन बाळगून आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हार्दिक पांड्याचे चाहते पुन्हा एकदा त्याच्या समर्थनात उतरले असून नताशाला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एका यूजरनं लिहिलं, 'हार्दिक कोपऱ्यात रडत आहे.' दुसऱ्या एकानं या पोस्टवर लिहिलं, 'हार्दिक हा व्हिडिओ दुसऱ्या अकाउंटवरून पाहत असेल.' आणखी एका व्यक्तीनं लिहिलं, 'असं काही करण्यासाठी तिनं हार्दिकला सोडलं आहे.' अलेक्झांडर हा टायगर श्रॉफची बहीण कृष्णाचा चांगला मित्र आहे. दिशा पटानी आणि अलेक्झांडर ॲलेक्स इलिक हे नात्यात असल्याच्या बातम्या या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. अलेक्झांडरची नेमकी कुठली गर्लफ्रेंड आहे, हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे.

हेही वाचा :

  1. ट्रोल करणाऱ्यांकडून नताशा स्टॅनकोविकची अचानक माफी, काय आहे कारण? - hardik jasmin dating rumours
  2. नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या कोणाला करत आहे डेट? वाचा सविस्तर - HARDIK PANDYA
  3. हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड अली गोनीनं केला नताशा स्टॅनकोविकवर प्रेमाचा वर्षाव - Natasa Stankovic Ex Boyfriend

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.