मुंबई - 2013 पासून महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केल्या जात आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनानं त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला होता. या दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आज आम्ही 'मराठी भाषा गौरव दिन'निमित्त काही सुंदर मराठी गाण्याची यादी तुमच्या घेऊन आलो आहोत. ही गाणी तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये सामील करू शकता.
1 'गुलाबी साडी' : गायक संजू राठोड यांनी गायलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं जगभरात लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामुळे संजू राठोड यांना मराठी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्यावर जगभरात खूप रिल्स बनविण्यात आले आहेत. 'गुलाबी साडी' हे गाणं 2024मध्ये प्रदर्शित झाले आहे. हे गाणं न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरच्या बोर्डवर दाखवलं गेलं होतं. या गाण्याबद्दल एका संवादादरम्यान संजू राठोड यांनी सांगितलं होतं की, हे गाणं एका तासात रचलं गेलं होतं. 'गुलाबी साडी' हे गाणं खूप दमदार आहे. या गाण्याला यूट्यूबवर 2.7 दशलक्ष लोकांनी लाईक केलं आहे. या गाण्यात संजू राठोड आणि प्राजक्ता घाग हे कलाकार दिसले आहे.
2 'ऐका दाजीबा' : वैशाली सामंत यांनी गायलेले 'ऐका दाजीबा' गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. हे गाणं 28 डिसेंबर 2002मध्ये प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलं आहे. हे गाणे सागरिका म्युझिकचे पॉप शैलीतील पहिले हिट होतं. या गाण्यात इशिता अरुण आणि मिलिंद गुणाजी हे कलाकार दिसले आहेत. 'ऐका दाजीबा' गाण्याला यूट्यूबवर 11 दशलक्ष लोकांन लाईक केलं आहे. 90च्या दशकातील आयकॉनिक गाणं दोन दशकांनंतर पुन्हा तयार करण्यात आलं आहे. 'ऐका दाजीबा' नवीन वर्जन 4 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज झालं आहे.
3 'गोव्याचे किनाऱ्याव' : शुभांगी केदार, रजनीश पटेल आणि प्रवीण कोळी यांनी गायलेलं 'गोव्याचे किनाऱ्याव ' हे गाणं देखील खूप हिट झालं होतं. या गाण्याला संगीत प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी दिलंय. फिनिक्स स्टुडिओ आणि कबीरा स्टुडिओ यांनी हे गाणं निर्मित केलंय. या गाण्यात सुहृद वर्देकर आणि सिद्धी पाटणे हे कलाकार दिसले आहेत. हे गाणं 2018मध्ये प्रदर्शित झाले होतं. या गाण्याला 786 हजार अधिक लोकांनी पसंत केलं आहे.
4 'नौवरी' (नऊवारी) पाहिजे : संजू राठोड यांनी गायलेलं 'नौवरी' गाणं देखील खूप लोकप्रिय झालं आहे. हे गाणं 2023मध्ये प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला संगीत देखील संजू राठोड यांनी दिलंय. या गाण्यात संजू राठोड आणि प्राजक्ता घाग हे कलाकर आहेत. 'नौवरी' गाण्याला देखील यूट्यूबवर 744 हजार लोकांनी पसंत केलंय. या गाण्यावर देखील खूप रिल्स बनविण्यात आले आहेत.
5 'इश्काची नौका' : शुभांगी केदार आणि केवल वालंज यांनी गायलेलं 'इश्काची नौका' हे गाणं देखील खूप लोकप्रिय झालं होतं. या संगीत प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी दिलंय. या गाण्यात ऋषी सक्सेना, प्रांजल पालकर हे कलाकार दिसले आहेत. हे गाणं 2018 मध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला यूट्यूबवर 182 हजार लोकांनी पसंत केलंय.