मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनचे अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत आहेत. अनेकजण अल्लू अर्जुनला याप्रकरणी पाठिंबा देत आहेत. दरम्यान यावर बॉलिवूड अभिनेता वरुण धवननं मोठे वक्तव्य केलं आहे. वरुणनं म्हटलं की, 'एक अभिनेता सुरक्षितेतशी संबंधित सर्व प्रोटोकॉल स्वत: घेऊ शकत नाही. तुमच्या सभोवताली असणाऱ्या लोकांना सांगण्याचं गरजेचं आहे. घडलेला अपघात खूप वेदनादायी असला तरी, या संपूर्ण प्रकरणासाठी तुम्ही एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही.'
अल्लू अर्जुनच्या अटकेवर वरुण धवननं केलं विधान : अभिनेता वरुण धवन हा शुक्रवारी त्याच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनसाठी जयपूरला गेला. यावेळी त्यानं अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत विधान केलं होतं. दरम्यान अल्लू अर्जुनवर 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या चित्रपटगृहामध्ये, जेव्हा अल्लू अर्जुन आला, तिथे खूप गर्दी जमली होती. यानंतर तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. चेंगराचेंगरीमध्ये तिथे अनेकजण जखमी झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती. यात सध्या चित्रपटगृहाचे मालक आणि तेथेल दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
" actors cannot take everything upon themselves, they can only advise those around them to take care. my condolences to them, but it is unfair to place everything on one person."
— WC (@whynotcinemasHQ) December 13, 2024
- #VarunDhawan Reacts to #AlluArjun 's Arrest. pic.twitter.com/E29dWZOIcG
BREAKING : Telangana Police arrests Allu Arjun after a woman died during a premiere of Pushpa where the actor arrived without any crowd management control or safety measures.
— Roshan Rai (@RoshanKrRaii) December 13, 2024
What a message by Telangana Police - No one is above the law 🔥 pic.twitter.com/0YW28QwYYY
Why police arrest allu arjun in stampade case ?
— i_photocopy (@i_photocopy) December 13, 2024
He has done nothing 🤬#AlluArjunArrest pic.twitter.com/pWERxTsiJk
Breaking!🚨
— 🇮🇳POOJA KUSHWAHA (@poojak1010) December 13, 2024
Hyderabad Police arrested Allu Arjun, in a case where a Lady d!ed due to stampede in theatre
Dear fans, stay calm, he will get Bail & come out. Don't do anything stup!d. Don't risk urself 🙌#AlluArjun #AlluArjunArrest pic.twitter.com/dU4uq8OPe3
'बेबी जॉन' महिला सुरक्षेवर केंद्रित चित्रपट : दरम्यान 'बेबी जॉन' चित्रपटाच्या प्रमोशनबाबत वरुण धवननं सांगितलं की, 'हा चित्रपट महिलांच्या सुरक्षेवर आधारित आहे. आज देशात महिलांची सुरक्षा ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. अनेक अपघात झाले आहेत.' यानंतर त्यानं निर्भया आणि हाथरस घटनेचाही उल्लेख करत या घटनांचा विचार करून हा चित्रपट बनविण्यात आल्याचं सांगितलं. 'बेबी जॉन' चित्रपटात वरुण धवन एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. आपल्या भूमिकेबाबत त्यानं सांगितलं, 'देशात महिलांशी संबंधित अनेक अपघात होत आहेत. काही दिवसांपासून लोकांमध्ये याबाबत संताप करत आहे, मात्र एखादी नवीन घटना उघडकीस आल्यानंतर लोक मागील घटना विसरून जातात.' यानंतर वरुणनं 'बेबी जॉन' चित्रपटात एका लहान मुलीचीही महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं. 'बेबी जॉन' चित्रपट हा रुपेरी पडद्यावर 25 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा :