ETV Bharat / bharat

Shiv Jayanti 2024 : गडकिल्ले महाराष्ट्राची अस्मिता; यंदा शिवजयंतीला 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 3:02 PM IST

Updated : Feb 19, 2024, 6:43 AM IST

Shivaji Maharaj Jayanti 2024 : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti 2024) 19 फेब्रुवारीला उत्साहात साजरी केली जाते. यंदा शिवजयंतीला महाराष्ट्रातील 'या' पाच गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या.

Shivaji Maharaj Jayanti 2024
गडकिल्ल्यांना भेट

पुणे Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर (shivneri Fort) झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj Jayanti) स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा (Shiv jayanti 2024) याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर आणि रयतेवर जीवापाड प्रेम केलं. राज्यातील ऐतिहासिक गड किल्ले हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. तर शिवाजी महाराजांनी एकूण १६० किल्ले जिंकले आहेत. यातील पाच किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत.

shivneri Fort
शिवनेरी किल्ला
  • शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळं या किल्ल्याला इतिहासामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाई देवीचं मंदिर आहे. शिवनेरीवर 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Murud Janjira Fort
मुरुड जंजिरा किल्ला
  • मुरुड जंजिरा किल्ला (Murud Janjira Fort) : मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील अलिबागपासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुड किनाऱ्यावरील बेटावर स्थित एक शक्तिशाली किल्ला आहे. मुरुड जंजिरा किल्ला सुमारे 350 वर्ष जुना असल्याचं मानलं जातं. तो बांधण्यास 22 वर्षे लागली होती.
Daulatabad Fort
दौलताबाद किल्ला
  • दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort) : प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये आणखी एक नाव म्हणजे दौलताबादचा किल्ला. याला देवगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखतात. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात असणारा हा किल्ला इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. शत्रूला गडावर चाल करताच येऊ नये अशी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती. संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या किल्ल्यावर येण्यासाठी 750 पायऱ्या चढाव्या लागतात.
Vijaydurg Fort
विजयदुर्ग किल्ला
  • विजयदुर्ग किल्ला (Vijaydurg Fort) : हा सिंधुदुर्गातील एक सर्वात जुना किल्ला असून, कोकण किनारपट्टीवरील हा एक अद्भूत किल्ला ठरतो. राजा भोज दुसरा यांच्या कालखंडात या किल्ल्याची निर्मिती करण्यात आल्याचा संदर्भ आढळतो.
Purandar Fort
पुरंदर किल्ला
  • पुरंदर किल्ला (Purandar Fort): पुण्यातल्या पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाचा म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंचा जन्म झाला होता. या गडाला बालेकिल्ला आणि दिल्ली दरवाजा असे दोन भाग आहेत.

हेही वाचा -

  1. Shiv Jayanti : सरकार गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम करेल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. Ambenali Ghat Closed : दुरुस्तीच्या कामासाठी आंबेनळी घाटातील वाहतूक आज बंद
  3. Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास
Last Updated : Feb 19, 2024, 6:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.