नवी दिल्ली JEE Mains Result 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) बुधवारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE-Mains सत्र 2 चा निकाल जाहीर केला. 56 उमेदवारांनी JEE मुख्य सत्र 2 च्या निकाल 2024 मध्ये 100% गुण मिळवले आहेत. तर 39 उमेदवारांना JEE परीक्षेत अनुचित प्रकार केल्यामुळं त्यांना तीन वर्षांसाठी जेईई-मेनला बसण्यापासून रोखण्यात आलं आहे.
निलकृष्ण गाजरेनं देशात पहिला : या परिक्षेत निलकृष्ण गाजरेनं देशात पहिला तर दक्षेश मिश्रानं दुसरा येण्याचा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय प्रकाश आर्यन, महंमद सुफियान, विशारद श्रीवास्तव, प्रणव पाटील, अर्चित पाटील यांनाही 100 टक्के गुण मिळवले आहेत. जेईई मेन 2024 सत्र 2 चा निकाल 24 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) जाहीर केला. जेईई मेन 2024 सत्र 2 परीक्षेला बसलेले उमेदवार जेईई मेन्सच्या अधिकृत वेबसाइटवरून जेईई मेन 2024 सत्र 2 चा निकाल पाहू शकतात. जेईई-मेनमध्ये 56 उमेदवारांनी 100% गुण मिळवलं आहेत. यात सर्वाधिक विद्यार्थी तेलंगणातील आहेत.
राज्यातील 7 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण : राज्यातील जेईई मुख्य परीक्षेत प्रवर्गानुसार 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दशकेश मिश्रा, आर्यन प्रकाश, महंमद सुफियान, विशारद श्रीवास्तव तसंच अर्चित पाटील यांचा समावेश आहे. JEE मुख्य सत्र 2, 2024 ची परीक्षा 4 ते 12 एप्रिल दरम्यान भारतातील 319 शहरांमध्ये तसंच परदेशातील 22 शहरांमध्ये झाली. जेईई मेन परीक्षेत सुमारे 12.57 लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 100 टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांपैकी 15 तेलंगणातील, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील प्रत्येकी सात, दिल्लीतील सहा उमेदवार आहेत. ही परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू या भाषांमध्ये घेण्यात आली होती.
जेईई मुख्य सत्र 2 टॉपर लिस्ट 2024 :
- गजरे नीलकृष्ण निर्मल कुमार (महाराष्ट्र)
- दक्षेश संजय मिश्रा (महाराष्ट्र)
- आरव भट्ट (हरियाणा)
- आदित्य कुमार (राजस्थान)
- हुंडेकर विदित (तेलंगणा)
- मुथावरपू अनूप (तेलंगणा)
- व्यंकट साई तेजा मदिनेनी (तेलंगणा)
- चिंटू सतीश कुमार (आंध्र प्रदेश)
- रेड्डी अनिल (तेलंगणा)
- आर्यन प्रकाश (महाराष्ट्र)
- मुकुंथा प्रथमेश एस (तामिळनाडू)
- रोहन साई पब्बा (तेलंगणा)
- श्रीयश मोहन कल्लुरी (तेलंगणा)
- केसम चन्ना बसवा रेड्डी (तेलंगणा)
- मुरिकिनाटी साई दिव्या तेजा रेड्डी (तेलंगणा)
- मुहम्मद सुफियान (महाराष्ट्र)
- शेख सूरज (आंध्र प्रदेश)
- माकिनेनी जिष्णू साई (आंध्र प्रदेश)
- ऋषी शेखर शुक्ला (तेलंगणा)
- थोतमसेट्टी निकिलेश (आंध्र प्रदेश)
- अन्नारेड्डी वेंकट तनिश रेड्डी (आंध्र प्रदेश)
- हिमांशू थालोर (राजस्थान)
- थोटा साई कार्तिक (आंध्र प्रदेश)
- तव्वा दिनेश रेड्डी (तेलंगणा)
- रचित अग्रवाल (पंजाब)
- वेदांत सैनी (चंदीगड)
- अक्षत चपलोट (राजस्थान)
- पारेख विक्रमभाई (गुजरात)
- शिवांश नायर (हरियाणा)
- प्रियांश प्रांजल (झारखंड)
- प्रणवानंद साजी
- हिमांशू यादव (उत्तर प्रदेश)
- प्रथम कुमार (बिहार)
- सानवी जैन (कर्नाटक)
- गंगा श्रेयस (तेलंगणा)
- मुरासानी साई यशवंत रेड्डी (आंध्र प्रदेश)
- शायना सिन्हा (दिल्ली)
- माधव बन्सल (दिल्ली)
- पॉलिसेट्टी रितेश बालाजी (तेलंगणा)
- विशारद श्रीवास्तव (महाराष्ट्र)
- सायनवनात मुकुंद (कर्नाटक)
- तान्या झा (दिल्ली)
- थमथम जयदेव रेड्डी (तेलंगणा)
- कनानी हर्षल भरतभाई (गुजरात)
- यशनील रावत (राजस्थान)
- ईशान गुप्ता (राजस्थान)
- अमोघ अग्रवाल (कर्नाटक)
- इप्सित मित्तल (दिल्ली)
- मावरू जसविथ (तेलंगणा)
- भावेश रामकृष्णन कार्तिक (दिल्ली)
- पाटील प्रणव प्रमोद (महाराष्ट्र)
- दोरिसाला श्रीनिवास रेड्डी (तेलंगणा)
- अर्चित राहुल पाटील (महाराष्ट्र)
- अर्श गुप्ता (दिल्ली)
- श्रीराम (तामिळनाडू)
- आदेशवीर सिंग (पंजाब)
हे वाचलंत का :