बंगळुरू : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर मोठे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा नेत्यांनी ऑपरेशन कमळ राबवण्यासाठी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. म्हैसूर इथल्या एका कार्यक्रमात बोलताना सिद्धरामय्या यांनी हा आरोप केला आहे. सिद्धरामय्या यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या 50 आमदारांना प्रत्येकी 50 कोटींची ऑफर : बुधवारी म्हैसूर जिल्हा प्रशासनानं टी नरसेपूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचं उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी 470 कोटी रुपयांच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर थेट लाभार्थ्यांना लाभाचं वितरण करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी, भाजपानं काँग्रेस आमदारांना 50 कोटींची ऑफर दिली. हा पैसा कुठून येतो? येडियुरप्पा, बोम्मई, यांनी पैसे छापले आहेत का? राज्याची लूट करुन उभारलेला हा पैसा आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
मला आणि माझ्या पत्नीला लक्ष्य केलं जात आहे : "राज्यात सीबीआय, ईडी, आयटी आणि राज्यपाल यांच्या माध्यमातून सत्तेचा खेळ करण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. तर मला आणि माझ्या पत्नीला लक्ष्य केलं जात आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. मी मागील 40 वर्षापासून मंत्री आहे. मला आणि माझ्या पत्नीला खोट्या केसमध्ये ओढता का? राज्यातील जनतेला मूर्ख समजत आहात का? राज्यातील जनतेचे आशीर्वाद माझ्यावर आहेत, तोपर्यंत मी भाजपा आणि केंद्र सरकारच्या कारवाईला घाबरत नाही. विनाकारण कारवाई केल्यास आम्ही गप्प बसणार नाही," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :
- एम सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या : MUDA घोटाळ्यात दाखल झाला गुन्हा - FIR Against CM Siddaramaiah
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात होणार चौकशी, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब! - MUDA Case
- सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्यानं काँग्रेस आक्रमक, राज्यव्यापी आंदोलन करणार - Karnataka MUDA Case