Self Defense Lesson अमरावतीत महिला, युवती होत आहेत स्वसंरक्षणासाठी सज्ज - self defense lesson
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती युवती आणि महिलांच्या छेड काढण्याच्या घटना सातत्याने वाढत असताना संकट प्रसंगात स्वतःचा बचाव करण्यासाठी युवती आणि महिलांनी सज्ज राहावे यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालय आणि रणरागिणी ग्रुपच्यावतीने Ranragini Group शहरातील युवती आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात self defense lesson आहेत. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर स्वसंरक्षणासाठी अनेक महिला सज्ज होत self defense lesson by Ranragini Group आहेत. जर कुठे युतीची कुणी छेड काढली किंवा त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला अशा संकट प्रसंगाचा सामना करण्यासाठी त्यांना जुडो, कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षण करता यावे यासाठी त्यांना खास असे प्रशिक्षण दिले जात आहे. अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या पुढाकाराने शहरातील पोलीस कुटुंबा महिलांची संघटना असणाऱ्या रणरागिणी ग्रुपच्या वतीने हाच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात शेकडो युती आणि महिला सहभागी झाल्या असून त्यांना संकट काळा स्वतःचे रक्षण करण्यासाठी कराटे मास्टर संतोष कांबळे प्रशिक्षण देत आहेत.