ओबीसीच्या वाट्याचे आरक्षण नाकारणाऱ्या संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत - वडेट्टीवर - Maratha Reservation Latest News Amravati
🎬 Watch Now: Feature Video

आम्हाला ओबीसीच्या वाट्याचे आरक्षण नको आहे, असं खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही लोक ओबीसी समाजातील नेत्यांना मारण्याची धमकी देत आहेत, हे अतिशय चूक आहे, कोणाला मारण्याने कधीही आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.