Chief Minister Arvind Kejriwal :'4 ऑगस्टला दिल्लीत हजारो लहान मुलं जगातील सर्वात मोठा तिरंगा बनवणार'
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - 4 ऑगस्टला दिल्लीत हजारो मुले जमतील. ते जगातील सर्वात मोठा तिरंगा बनवणार आहे. त्या दिवशी आम्ही शपथ घेऊ की आता भारत कधीच थांबणार नाही. 130 कोटी भारतीय मिळून भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनवतील. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. या 75 वर्षात अनेक देशांनी आपल्याला मागे टाकले, असे असले तरी आम्ही कोणापेक्षा कमी नाही. हे या दिवशी दाखवून द्या, असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी केले आहे.