Chandrasekhar Guruji: वास्तूतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकमध्ये चाकून भोकसून हत्या
🎬 Watch Now: Feature Video
हुबळी (कर्नाट) - सरल वास्तू तज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकातील हुबळी येथे हत्या करण्यात आली आहे. येथील एका हॉटेलमध्ये त्यांची हत्या झाली आहे. ( Architect Chandrasekhar Guruji stabbed to death in Karnataka ) दोनजण भाविक म्हणून आले होते आणि नंतर त्यांनी चाकूने भोकसून गुरूजी यांची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोरांनी चंद्रशेखर गुरुजींवर हल्ला करताच तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पळ काढला. या घटनेनंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी सांगितले की, ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये काही लोकांनी त्यांना बोलावले होते. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अचानक त्यांनी हल्ला केला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.