thumbnail

By

Published : Apr 11, 2021, 12:38 PM IST

ETV Bharat / Videos

विरारमध्ये विकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन; मॉर्निंग वॉक, सायकलिंगसाठी नागरिक रस्त्यावर

पालघर/विरार - आज (रविवार) विकेंड लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. मात्र, काही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीयेत. विरार पश्चिमेकडील जकातनाका येथे असलेल्या म्हाडाच्या रोडवर नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास अनेक बेजवाबदर नागरिक मॉर्निंग वॉक व जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या संख्येवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर शनिवार रविवारी विकेंड लॉकडाऊन लागूकरण्यात आला आहे. या विकेंड लॉकडाऊनमध्ये आत्यावश्यक सेवा वगळत इतर सर्व सेवा बंद ठेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. मात्र, पालघर विरारमध्ये काही नागरीक विकेंड लॉकडाऊचे पालन करताना दिसून येत नाहीयेत. अशा बेजबाबदार नागरीकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.