तुला माहितीये का आम्ही कोण आहोत? गाणी बंद केल्याने टोळक्याची बार व्यवस्थापकाला मारहाण - shivsena leader son
🎬 Watch Now: Feature Video

औरंगाबाद- 'तुम्ही म्युझिक सिस्टिम बंद करायला का सांगितले, 'आम्ही कोण आहोत, तुला माहितीये का?' असे म्हणत शिवसेनेचा पदाधिकारी व एका शिक्षण संस्थाचालकाच्या मुलाने बारच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण करून हॉटेलमध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. हडको कॉर्नर येथे हॉटेल लोटस व बार मध्ये गुरुवारी रात्री हा राडा झाला. या मारहाणीत बार व्यवस्थापक उचित यांच्या पायाचे हाड मोडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अनिकेत रतन वाघ, अभिषेक हिरा सलामपुरे यांच्यासह इतर दोघांवर बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलीप साहेबराव उचित (५१) तीन वर्षांपासून हे लोटस बारमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. गुरुवारी(2 स्पटेंबर) ते नेहमीप्रमाणे काम करत होते. सध्या रात्री दहा वाजताच बार बंद करण्याचे निर्देश असल्याने त्यांनी सर्व ग्राहकांना ऑर्डर देण्यास सांगितले. तसेच त्यांनी साडेनउ वाजता बारमधील गाणी बंद केली. मात्र, आरोपींनी परस्पर म्युझिक सिस्टिम सुरू करून मोठ्या आवाजात गाणे सुरू केले. त्यानंतर अनिकेत, अभिषेक व इतर टोळक्यांनी दिलीप उचित यांना 'तुम्ही म्युझिक सिस्टिम बंद करायला का सांगितले,' असे म्हणून धक्काबुक्की सुरू केली. तसेच 'आम्ही कोण आहोत, तुला माहितीये का?' असे म्हणत उचित यांना बार बाहेर ओढत नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.