निसर्गसोंदर्याने नटला भीमाशंकर परिसर, पांढऱ्या शुभ्र धुक्याच्या चादरीत हरपले मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
भीमाशंकर/पुणे - सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले हे भीमाशंकर देवस्थान महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पांढरीशुभ्र धुक्याची चादर वेढलेला हा परिसर रिमझिम पावसात शहारून गेला आहे. याच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी शहरातून पर्यटक व भाविकभक्त मोठ्या उत्साहात या परिसरात येत असतात. परंतु कोरोनाचा संसर्ग पाहता यंदा पर्यटकांना या परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जाती-धर्माच्या सीमा पार करत देशभरातून भाविक भीमाशंकरला दाखल होतात. प्रशासन व देवस्थान यांच्याकडून भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यातून भीमाशंकराचा हा परिसर पांढऱ्या शुभ्र धुक्यात थंडगार वातावरणात निहाळून गेल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांचे मन प्रसन्न होत असते. याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी तुषार झरेकर याने.
Last Updated : Jul 24, 2021, 2:57 PM IST