MLA Bachu Kadu आमदार बच्चू कडू यांचे शक्ती प्रदर्शन, कार्यकर्त्यांसाठी स्वयंपाक तयार - प्रहारच्या कार्यकर्त्ये
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू आज अमरावतीच्या नेहरू मैदान येथे शक्ती प्रदर्शन करणार Show of power by MLA Bachu Kadu in Amravati आहेत. या शक्ती प्रदर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या प्रहारच्या 8000 कार्यकर्त्यांसाठी टाऊन हॉल येथे स्वयंपाक तयार झाला आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन स्थळीच जेवण मिळावे यासाठी मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासूनच स्वयंपाकाला सुरुवात झाली. पोळी डाळ भाजी आणि भात असा मेनू जेवणात आहे. नेहरू मैदान येथे प्रहारच्या शक्ती प्रदर्शन Show of power by MLA Bachu Kadu स्थळी कार्यकर्त्यांसाठी स्वयंपाक तयार झाला असून आता कार्यकर्त्यांचीच वाट आहे. असे बाकी स्वयंपाक तयार करणारे राजेश तट्टे ईटीव्ही भारतसोबत बोलताना म्हणाले. 12 क्विंटलच्या पोळ्या 3 तीन क्विंटलचा भात आणि 14 गंज भाजी येथे शिजवण्यात आली Cooking ready for Prahar workers आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST