MP Udayanaraje Bhosale On Bounce callar : कॉलर का उडवतो, उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले..पाहा व्हिडिओ - Udayanaraje Bhosale explanation on bounce collar
🎬 Watch Now: Feature Video

सातारा : खासदार उदयनराजे भोसले MP Udayanaraje Bhosale हे त्यांची बेधडक वक्तव्ये, खोचक टोमणे, मिश्किल टीकाटीपण्णी आणि स्टाईल इज स्टाईल म्हणत कॉलर उडवणे, या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. साताऱ्यातील छत्रपती कृषी, औद्योगिक महोत्सवात बोलताना आपण कॉलर का उडवतो MP Udayanaraje Bhosale on Bonce callers, आपला टीआरपी MP Udayanaraje Bhosale TRP कशामुळे आहे, याबद्दल उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले. ते म्हणाले, मी मोठा आहे असं दाखवण्यासाठी मीडियासमोर बोलत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर MP Udayanaraje Bhosle farmers issue कुणीतरी बोललं पाहिजे. मी लोक हिताचे प्रश्न मीडियासमोर घेऊन जातो. म्हणून माझा टीआरपी आहे. कोणीही माझ्यासारखे छातीठोकपणे भाषण करून दाखवावे. मी जे बोलतो ते मनापासून बोलतो. मी करेक्ट वागतो म्हणून कॉलर उडवतो, असे सांगत त्यांनी आपल्या स्टाईलने कॉलर उडवून दाखवली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST