Atul Londhe Criticized फॉक्सकॉनच्या प्रकल्प राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिटर्न गिफ्ट; अतुल लोंढेचा गंभीर आरोप
🎬 Watch Now: Feature Video
Atul Londhe Criticized नागपूर शिवसेनेला सत्तेतून बाहेर खेचून एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सरकार अस्तित्वात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठा रोल राहिला आहे. फॉक्सकॉनच्या माध्यमातून मोदींना रिटर्न गिफ्ट दिल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे Congress Atul Londhe यांनी केला आहे. वेदांत- फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा यासाठी काँग्रेस आंदोलन करेल असा इशाराही लोंढे यांनी दिला आहे. वेदांत- फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप प्रकल्प गुजरातला नेण्याच्या निर्णयावर राज्यात सत्ताधारी व विरोधकांत जोरदार वाद सुरु आहे. अशात शिंदे- फडणवीस सरकारच्या कार्यकाळातच उच्चाधिकार समितीने फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कंपनीने मागितलेल्या सर्व सुविधा व सबसिडी देण्याची शिफारस उच्चाधिकार समितीने केली होती, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST