Dagdusheth Ganpati : अजित पवार समर्थकांकडून दगडूशेठ गणपतीची महाआरती; 'ही' केली प्रार्थना...
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. पुण्यात आज अजित पवार समर्थकांनी दगडूशेठ गणपतीची आरती करून, राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांना बळ मिळू दे अशी प्रार्थना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट तयार झाले आहेत. कालच अजित पवार गटाकडून प्रवक्त्या म्हणून रुपाली पाटील ठोंबरे यांची नियुक्ती केली होती. त्यांच्यासह अजित पवार समर्थक प्रदीप देशमुख आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज चतुर्थी निमित्त महाआरती केली आहे. अजित पवार यांच्या हातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यासाठी गणपतीचा त्यांना आशीर्वाद मिळावा. त्यांच्या मनातल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्याचबरोबर अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. अशी प्रार्थना सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी केली असल्याचे प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे. आज संकष्टी चतुर्थी असल्याने दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना मंदिराच्या बाहेरूनच आरती करण्याची परवानगी देण्यात आली होती.