thumbnail

By

Published : Nov 17, 2022, 12:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ETV Bharat / Videos

मुख्यमंत्र्यांच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण

मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले आहे. CM eknath shinde visit balasaheb thackeray शिंदे आपल्या आमदारांबरोबर शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. balasaheb thackeray memorial place यानंतर ते आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. पण शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह शिवतीर्थावरुन निघाल्यानंतर लगेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले होते. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे. एकनाथ शिंदे शिवतीर्थावरुन निघून गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची जागा शुद्ध करण्यासाठी शिवतीर्थावर गोमूत्र शिंपडले आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.