Heavy rain in Gondia : गोंदियात अतिवृष्टी.. नाल्यात २१ वर्षीय मुलगा गेला वाहून - घरात पाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान
🎬 Watch Now: Feature Video

गोंदियात कालपासून मुसळधार पाऊस सुरु ( Heavy rain in Gondia since night ) आहे. अतिवृष्टी झाल्याने नदी, नालेही भरले आहेत. अनेक मार्ग बंद झाले आहेत. गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यांवर गुडघ्यांच्यावर पाणी जमा झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. रिंग रोड परिसरातील नाल्यात २१ वर्षीय हा मुलगा वाहून गेला ( 21 year old boy swept into drain ) आहे. रोहित गिल असे त्याचे नाव आहे. त्याला शोधण्याचा कार्य सुरु आहे. त्याशिवाय रस्त्यांवर असलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने एक ट्रक पलटला आहे.गोंदियात रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले ( Roads looks like a ponds ) होते. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका आदर्श कॉलनीला बसला असून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घर मालकांचे मालमत्तेचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तविन्यात येत ( Damage of property due to water entering the house ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST