VIDEO : मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार - ओबीसी-व्हीजेएनटी महामोर्चा - मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार
🎬 Watch Now: Feature Video

नांदेड - ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयानंतर ओबीसींमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. राज्य सरकारमधील नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार अशी भूमिका ओबीसी, व्हीजेएनटी महामोर्चाचे महासचिव बालाजी शिंदे यांनी घेतली आहे. इम्पेरिकल डेटा सादर केल्या शिवाय ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. याची जाणीव असताना देखील राज्य सरकारने तो तयार केला नाही, असा आरोप बालाजी शिंदे यांनी केला आहे. शिवाय राज्य सरकारमधील ओबीसी नेत्यांनी राजीनामे देऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST