पुण्यातील पोलीसाचा गणपती डान्स झाला व्हायरल - viral video 2021
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - सध्या गणेश उत्सवाचा माहोल सर्वत्र धूम धडाक्यात सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या मंडळाचं आणि घरघुती गणरायाच्या सेवेत मग्न आहे. कोरोनाचे नियम पाळून नागरिक गणेश उत्सव साजरा करत आहेत. पण बारा ते पंधरा तास गणेश उत्सवात बंदोबस्तासाठी असलेले पोलिसही आपल्या घरी गणरायाची स्थापना करून आनंद घेत आहेत. पुणे शहर पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान विजय चौधरी यांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केली आहे. त्यांनी गणराया समोर आनंदून केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Last Updated : Sep 13, 2021, 6:10 PM IST