बिहार विधानसभा निवडणूक : निकाल राज्य सरकारला धडकी भरवणारे - खोपडे - बिहारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - 'बिहार निवडणूकीचा निकाल लागला आहे. अपेक्षेप्रमाणे निकाल हा आमच्या बाजूने आला आहे. या निकालाचे परिणाम भविष्यात राज्यात दिसून येणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली योग्यता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बिहारच्या जनतेने विकासाला मत दिल्याचे सिद्ध झाले,' असे नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले आहे. 'ज्या पद्धतीने बिहारमध्ये सफाया झाला आहे, त्याच पद्धतीने राज्यातही काँग्रेसची अवस्था होईल. राज्यात तीन चाकांचे सरकार आहे, ते आपल्या वजनाने कोसळणार आहे,' असे भाकीतही खोपडे यांनी व्यक्त केले आहे.