तांदळाचे संरक्षण अन् संवर्धन करणारा 'देब'माणूस - डॉ. देबल देब लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

ओडिशा - हरित क्रांतीनंतर देशातील शेतकऱ्यांनी तांदळाच्या संकरित बियाणांची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यातून उत्पन्न तर मिळते मात्र, यामुळे तांदळाच्या अनेक पारंपरिक जाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब हे या जाती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. आतापर्यंत त्यांनी पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या १ हजार ४५२ दुर्मिळ जातींचे संवर्धन केले आहे. कटक जवळच्या एका मागासलेल्या गावात ते आपले तांदूळ संशोधन आणि संवर्धनाचे काम करत आहेत.