Ganeshotsav 2022 : ऑनलाईन फ्रॉडपासून सावध करणारा वर्दीतला बाप्पा; पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 1, 2022, 12:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

अंधेरी परिसरात राहणारे पोलीस अधिकारी राजेंद्र काणे यांनी आपल्या घरात पोलिसी गणवेशात Idol Ganpati In police uniform असलेल्या बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. राजेंद्र काणे हे विले पार्ले पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. सध्या आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने केले जातात. त्यामुळे वर्दीतल्या बाप्पाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ऑनलाइन फ्रॉडपासून कसे वाचावे याबात देखाव्यातून संदेश ही दिला Social message to avoid online fraud आहे. बाप्पाच्या हातात मोबाइल असून मोबाईल द्वारे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी असा संदेश बाप्पाच्या मूर्तीतून देण्यात आला. ऑनलाईन लॉटरी क्रेडिट कार्ड बँक खात्याची माहिती विचारणारे संदेश मोबाईलवर सातत्याने येत असतात. यातून सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे असे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी असा संदेश देखाव्यातून देण्यात आलेला आहे. Social message to avoid online fraud through Ganesh decoration
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.