ETV Bharat / sukhibhava

Sant Chokhamela Death Anniversary 2023 : कोण होते संत चोखामेळा, काय होते संत चोखामेळांचे कार्य

महाराष्ट्रातील संत परंपरेचा वारसा जपणारे महत्वाचे संत म्हणून संत चोकामेळा यांचा उल्लेख करण्यात येतो. संत चोखामेळा यांची विठ्ठलभक्ती सर्वश्रृत आहे. संत चोखोबा यांच्यासरख्याच त्यांच्या पत्नीदेखील विठ्ठलभक्त होत्या. त्यांचेही अनेक अभंग प्रसिद्ध आहेत.

Sant Chokhamela Death Anniversary 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2023, 1:10 PM IST

हैदराबाद : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून त्यातीलच संत चोखोबा हे एक महत्वाचे संत होऊन गेले आहेत. संत चोखोबांनी महाराष्ट्रात संत परंपरा रुजवली आहे. त्यामुळेच संत ज्ञानदेव आणि संत नामदेवांनी आपल्या या भक्ताच्या हाती वारकरी धर्माची पताका दिली. ती चोखोबांनी अगदी उत्तमपणे संभाळण्याचे काम केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत चोखोबा यांचे नाव मोठ्या अभिमानाने मिरवले जाते. 10 मे रोजी संत चोखोबा यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ संत चोखोबा यांच्याबाबतची ही विशेष माहिती.

कोण होते संत चोखोबा : संत चोखोबा यांची जन्मभूमी बुलडाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा ( मेहुणपुरी ) ही होती. मेहुणाराजा या परिसरात संत चोखोबा यांचे कुटूंब राहत होते. संत चोखोबा यांच्या घरात विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आली होती. सोयराबाई ही संत चोखोबाची पत्नी होती. संत चोखोबा हे दलित समाजात जन्माला आल्याने त्यांचा समाजाकडून मोठा छळ करण्यात आला. संत चोखोबांचा जो छळ झाला, त्याची वाटेकरी संत चोखोबांची पत्नी सोयराबाई या देखील होत्या. संत चोखोबांच्या सारखेच त्यांच्या पत्नी सोयराबाई यांचेही अभंग सुप्रसिद्ध आहेत.

अस्पृश्य समाजात जन्मल्याची खंत : संत चोखोबा यांचा जन्म अस्पृश्य समाजात झाला होता. मात्र कर्माने ते उच्च होते. त्यामुळेच संत ज्ञानदेव आणि संत नामदेवांनी वारकरी पंथाची पताका संत चोखोबांच्या खांद्यावर दिली होती. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा यांच्यावर संत चोखोबा आणि सोयराबाईच्या वारकरी पंथांचा वारशाचे विचार होते. मात्र तरीही आपण अस्पृश्य समाजात जन्मलो याची खंत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा यांना होती.

संत चोखोबांनी केला भागवत भक्तींचा जागर : संत चोखोबांनी आजन्म भागवत भक्तीचा जागर केला आहे. त्यांनी अतिशय शुद्ध आणि निर्मळ विचारांनी त्यांनी भक्तीचा जागर केला. चोखोबा हे शुद्ध आचरणाने आणि भक्ती विचाराने अतिशय उच्च होते. संत चोखामेळांनी वारकरी भक्तीचा दीप महाराष्ट्रात तेवत ठेवण्यासाठी अहोरात्र काम केले. त्यामुळेच प्रत्यक्ष पांडुरंगांनी चोखोबांच्या घरी भोजन केल्याची कथा वारकरी पंथात सांगितली जाते. संत चोखोबा वैशाख वद्य चतुर्थीला समाधीस्त झाले.

हेही वाचा - मोहिनी एकादशी 2023 : कशामुळे साजरी करण्यात येते मोहिनी एकादशी, जाणून घ्या आख्यायिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.