ETV Bharat / state

यवतमाळात व्यावसायिकाच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; अपहरणकर्त्याने केला व्हिडिओ कॉल

अपहरणकर्त्यांनी व्हिडिओ कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.

अपहरण झालेला हर्ष नचवानी
author img

By

Published : Jul 15, 2019, 9:11 PM IST

Updated : Jul 15, 2019, 11:24 PM IST

यवतमाळ - पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या तरुण मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. शहरातील शिवाजी गार्डन परिसरात ही घटना घडली.हर्ष ईश्वर नचवानी (वय 18) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अपहरणकर्त्यांनी केलेला व्हिडीओ कॉल

शहरातील शिवाजी गार्डन परिसरात नेहमी वर्दळ असते. हर्ष आज याच परिसरात आला होता. अपहरणकर्त्यांनी चोरीच्या दुचाकीवरून हर्षला चाकूचा धाक दाखवत त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला जंगलात नेऊन माराहण केली. तसेच हर्षच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तासाभरात खंडणीची रक्कम न मिळाल्यास हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर व्यावसायिक नचवानी यांनी अवधूत वाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता एमआयडीसी परिसरातील जंगालामध्ये असल्याचे समजले. मात्र, अद्यापही त्याचा पत्ता लागला नाही. आताही अवधूत वाडी पोलिसांकडून युद्धपातळीवर हर्षचा शोध घेणे सुरू आहे.

Intro:पन्नास लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिक पुत्राचे अपहरण
Body:यवतमाळ: पन्नास लाखांच्या खंडणीसाठी एका व्यावसायिक पुत्राचे गजबजलेल्या परिसरातून अपहरण करण्यात आले. ही घटना यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरात घडली.
हर्ष ईश्वर नचवानी असे अपहरण झालेल्या 18 वर्षीय युवकाचे नाव आहे. अपहरणकर्त्यांनी घटनेनंतर त्याला जंगलात मारहाण केली. तसेच अपहृत युवकाच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करीत 50 लाखांची खंडनी मागितली. तासाभरात रक्कम मिळाली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या या घटनेमुळे पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस त्यांचा शोध घेणे सुरू केले आहेत. यवतमाळ नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील जंगलामध्ये त्याचे लोकेशन ट्रेस झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. या भागात पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केली आहे. मात्र अद्यापही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. या अपरकर्त्यांनी चोरीच्या दुचाकीवरून हर्षला चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते. तसेच वडिलांना व्हिडिओ कॉल करून 50 लाख रुपयांची मागणीही करण्यात आली. एका तासामध्ये पन्नास लाख रुपये दिले नाही तर जीवे मारण्याची व हात-पाय तोडण्याची व्हिडिओतून संभाषण या मुलाचे दाखवण्यात आले आहेत. अवधूत वाडी पोलीस स्टेशन तर्फे या अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहेत. यासंदर्भात पोलिस निरीक्षक आनंद वागतकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 11:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.