ETV Bharat / state

पोलीस दलास मिळणार पोर्टेबल ऑफिस कॅबिन, रस्त्यावरील ड्युटी दरम्यान पडणार उपयोगी

author img

By

Published : Jun 1, 2021, 2:13 PM IST

जिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या 10 नगर परिषदांना प्रत्येकी दोन तसेच बंदोबस्ताकरीता 6 अशा 25 पोर्टेबल ऑफिस कॅबिन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 75 लाख 43 हजार 600 रूपयांचा निधी मंजूर केला आहे. 25 पोर्टेबल ऑफिस कॅबिन या निधीतून खरेदी करण्यात येणार आहेत. या कॅबिन कुठेही हलविता येणार असल्याने पोलीसांसाठी सोईचे होणार आहे.

पोर्टेबल ऑफिस कॅबिन बंदोबस्त
पोर्टेबल ऑफिस कॅबिन बंदोबस्त

यवतमाळ - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीसदल सतत कार्यशील असते. त्यातच बंदोबस्त, मोर्चे, व्हीआयपी दौरे या दरम्यान तर पोलीसांना क्षणभर विश्रांतीचीही मिळत नाही. हीच उणीव लक्षात घेऊन जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस दलासाठी विशेष बाब म्हणून 25 ‘पोर्टेबल आफिस कॅबिन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा नियोजन समितीने नुकतीच या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

मुंबईच्या धर्तीवर मिळणार वाहने

पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्री संजय राठोड
विविध सण, उत्सवांचे बंदोबस्त, मोर्चे, नेत्यांची सुरक्षा, रस्ते, चौक, महामार्गावर ड्युटी करत असताना पोलिसांना सतत ऊन, वारा, पाऊसात उभे राहावे लागते. विश्रांती व आडोशासाठी हक्काचे ‍ठिकाण उपलब्ध राहत नसल्याने कुठेतरी आडोसा घ्यावा लागतो. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तर ड्युटी दरम्यान अधिक कुचंबना होते. पोलीसांची ड्युटी दरम्यान होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांनी मुंबई तथा महानगरात पोलिसांसाठी वापरात येत असलेल्या ‘पोर्टेबल ऑफिस कॅबिन’ची संकल्पना मांडली. या संदर्भात पोलीस अधीक्षकांना या संदर्भात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. 25 पोर्टेबल ऑफिस कॅबिनजिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या 10 नगर परिषदांना प्रत्येकी दोन तसेच बंदोबस्ताकरीता 6 अशा 25 पोर्टेबल ऑफिस कॅबिन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 75 लाख 43 हजार 600 रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, पांढरकवडा, घाटंजी, उमरखेड व पुसद या 10 नगरपरिषदांना प्रत्येकी दोन आणि वेळोवेळी येणाऱ्या व्हिव्हिआयपीय बंदोबस्त, आंदोलने, मोर्चे, धरणे, संप, रस्त्यावरील बंदोबस्त यासाठी सहा अशा 25 पोर्टेबल ऑफिस कॅबिन या निधीतून खरेदी करण्यात येणार आहेत. या कॅबिन कुठेही हलविता येणार असल्याने पोलीसांसाठी सोईचे होणार आहे.कॅबिन खरेदीसाठी निधी मंजूरमुंबई, पुणे आदी ठिकाणी बंदोबस्तावरील पोलीसांसाठी अशा कॅबिन आहेत. त्या नेहमी पाहण्यात येत होत्या. एकदा मुंबईत ही कॅबिन निरखून पाहली, तेव्हा आपल्या भागातील पोलीसांसाठीही अशी व्यवस्था असली तर त्यांना बंदोबस्तावरील ड्युटी अधिक सोईचे होईल, असे लक्षात आले. त्यामुळे असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या. या कॅबिन खरेदीसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच पोलिसांच्या ताफ्यात या फिरत्या ऑफिस कॅबिन येणार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होईल. पोलीसांसाठी आपल्या कार्यकाळात चांगले काम करू शकलो, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

हेही वाचा-मुंबईत सोमवारी 86 हजार 887 लाभार्थ्यांचे लसीकरण

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.