ETV Bharat / state

शिवशाही धावते 'फायर सेफ्टी किट' विनाच; प्रवाशांचा जीव धोक्यात

author img

By

Published : Jan 24, 2020, 3:16 PM IST

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असा प्रचार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून केला जातो. मात्र, महामंडळाने भाडे तत्वावर घेतलेल्या शिवशाही बसेस फायर सेफ्टी किट विनाच धावत आहेत. याबाबत तक्रार व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली आहे.

shivshahi-bus-is-running-on-the-road-without-a-fire-safety-kit
शिवशाही धावते 'फायर सेफ्टी किट' विनाच

यवतमाळ - एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असा प्रचार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून केला जातो. मात्र, एसटी महामंडळ चालवत असलेल्या शिवशाहीचा प्रवास धोकादायक ठरतो आहे. शिवशाही बसेसमध्ये 'फायर सेफ्टी किट' बसवण्याबाबत करार करण्यात आला असतानाही ७० बसेसमध्ये ही किट लावली गेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्याचे दिसत आहे.

शिवशाही धावते 'फायर सेफ्टी किट' विनाच

युती सरकार मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडे तत्वावर सुरु केलेल्या शिवशाही बस मध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षिततेबाबत असुविधा असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. शिवशाही बसमध्ये अत्यावश्यक असलेली फायर डिटेक्शन व संप्रेषण सिस्टीम म्हणजेच एफडीएसएस प्रणाली लावण्यात संबंधित कंत्राटदाराने बनवाबनवी केली. मे. जय एजन्सीज व महामंडळात शिवशाही बस भाडेतत्वावर चालवण्याबाबत १७ फेब्रुवारी २०१८ रोजी करार झाला. करारानुसार महामंडळाला १०८ शिवशाही बस देण्याचा व त्यात एफडीएसएस बसविण्याचे ठरले. मात्र, जय एजन्सी ने ९० बसेस उपलब्ध करून दिल्या व २०१८ पासून ते आतापर्यंत केवळ २० शिवशाही बसेस मध्येच फायर सेफ्टी किट बसवण्यात आला. याबाबत शशांक बोरेले यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तपासणी केली असता बस असुरक्षित पद्धतीने धावत असल्याचे निदर्शनास आले.

जय एजन्सीने ९० पैकी ७० बसेसमध्ये एफडीएसएस बसवण्याचे फक्त पार्ट विकत घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तात्पुरती किट बसवून प्रत्येक डेपोमधून बस पास करण्यात आल्या व किट काढून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे महामंडळाच्या एआयएस १३५ मानक प्रमाणे बेकायदेशीर फायर किटच्या बसेस रस्त्यावर धावत असल्याचा आरोप देखील तक्रारीतून करण्यात आला आहे. एकंदरीत सर्वसामान्यांच्या जिवाशी हा खेळ केवळ खर्च वाचविण्यासाठी सुरू असल्याचा आरोप तक्रारकर्ते शशांक बोरले यांनी केला आहे. दरम्यान तक्रारीनंतर महामंडळ मात्र कंत्राटदारावर कारवाईस चालढकल करत आहे. तपासणीत एफडीएसएस विना बस चालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली तरीही एफडीएसएस बसविण्यात आल्या नसून जय एजन्सी ला १५ दिवसांची तीन वेळा मुदतवाढ दिली गेली आहे.

वाढत्या अपघातांमुळे आधीच अनेक प्रश्न उपस्थित होत असलेल्या शिवशाही बस मध्ये फायर डिटेक्शन व संप्रेषण सिस्टीम देखील बसविल्या न गेल्याने शिवशाहीचा प्रवास खरंच सुरक्षित प्रवास म्हणता येईल का? आणि ही बनवाबनवी करणाऱ्या जय एजन्सीवर महामंडळाची मेहेरबानी का? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Intro:Body:यवतमाळ : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असा प्रचार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून केला जातो. मात्र एसटी महामंडळ चालवीत असलेल्या शिवशाहीचा प्रवास धोकादायक प्रवास ठरतो आहे. शिवशाही बसेसमध्ये 'फायर सेफ्टी किट' बसवण्याबाबत करार करण्यात आला असतानांही ७० बसेस मध्ये ही किट लावली गेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तक्रार झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्याचे दिसत आहे.

युती सरकार मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडे तत्वावर सुरु केलेल्या शिवशाही बस मध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षिततेबाबत असुविधा असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. शिवशाही बस मध्ये अत्यावश्यक असलेली फायर डिटेक्शन व संप्रेषण सिस्टीम म्हंजेचच एफडीएसएस प्रणाली लावण्यात संबंधित कंत्राटदाराने बनवाबनवी केली. मे. जय एजन्सीज व महामंडळात शिवशाही बस भाडेतत्वावर चालविण्याबाबत १७ फेब्रुवारी २०१८ रोजी करार झाला. करारानुसार महामंडळाला १०८ शिवशाही बस देण्याचा व त्यात एफडीएसएस बसविण्याचे ठरले मात्र जय एजन्सी ने ९० बसेस उपलब्ध करून दिल्या व २०१८ पासून ते आतापर्यंत केवळ २० शिवशाही बसेस मध्येच फायर सेफ्टी किट बसवण्यात आली. याबाबत शशांक बोरेले यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तपासणी केली असता बस असुरक्षित पद्धतीनं धावत असल्याचे निदर्शनास आले.

जय एजन्सी ने ९० पैकी ७० बसेसमध्ये एफडीएसएस बसवण्याचे फक्त पार्ट विकत घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तात्पुरती किट बसवून प्रत्येक डेपोमधून बस पास करण्यात आल्या. व किट काढून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे महामंडळाच्या एआयएस १३५ मानक प्रमाणे बेकायदेशीर फायर किटच्या बसेस रस्त्यावर धावत असल्याचा आरोप देखील तक्रारीतून करण्यात आला आहे. एकंदरीत सर्वसामान्यांच्या जिवाशी हा खेळ केवळ खर्च वाचविण्यासाठी सुरू असल्याचा आरोप तक्रारकर्ते शशांक बोरले यांनी केला आहे. दरम्यान तक्रारीनंतर महामंडळ मात्र कंत्राटदारावर कारवाईस चालढकल करीत आहे. तपासणीत एफडीएसएस विना बस चालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली तरीही एफडीएसएस बसविण्यात आल्या नसून जय एजन्सी ला १५ दिवसांची तीन वेळा मुदतवाढ दिल्या गेली आहे.

वाढत्या अपघातांमुळे आधीच अनेक प्रश्न उपस्थित होत असलेल्या शिवशाही बस मध्ये फायर डिटेक्शन व संप्रेषण सिस्टीम देखील बसविल्या न गेल्याने शिवशाहीचा प्रवास खरंच सुरक्षित प्रवास म्हणता येईल का? आणि ही बनवाबनवी करणाऱ्या जय एजन्सी वर महामंडळाची मेहेरबानी का? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

बाईट : शशांक बोरेले : तक्रारकर्ता
बाईट : श्रीनिवास जोशी : विभाग नियंत्रक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.