यवतमाळ - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्याच बरखास्त करण्याचे संकेत दिले. हा खरेतर शेतकऱ्यांनाच संपविण्याचा घाट असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या सभापतींनी केली आहे. याविरोधात राज्यभर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा यावेळी या सभापतींनी दिला आहे.
हेही वाचा... माध्यमिक शालान्त परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; दहावी 3 मार्च, तर बारावीची 18 फेब्रुवारी पासून 'परीक्षा'
यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले गेले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम प्रणालीचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ठेवीत राबविता येते. मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत व्यापाऱ्यांनाच आधार दिला आहे, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता
या निर्णया विरोधात राज्यभर आंदोलन उभे केले जाणार आहे. केंद्र सरकारकडे निवेदन दिले जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, राळेगावचे सभापती अॅड. प्रफुल्ल मानकर, आर्णीचे सभापती राजू पाटील, उमरखेडचे सभापती बाळासाहेब चंद्रे, मारेगावचे सभापती नरेंद्र ठाकरे, नेरचे नरेंद्र राऊत, यवतमाळचे सभापती रवींद्र ढोक, नरेंद्र कोंबे, कापूस पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर उपस्थित होते.