यवतमाळ - जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील पिंपळखुटी चौफुली येथे निवडणूक भरारी पथकाने 5 लाखाची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या पथकाने केली.
हेही वाचा - मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण : एका आरोपीची अखेर पोलिसांसमोर कबूली..
धनकर्मा अडारी असे या व्यक्तीचे नाव असून तो हैदराबाद येथून नागपूर येथे जात होता. त्याच्या कारमधून 5 लाख रुपयांची रोकड होती. दरम्यान, नाक्यावरती वाहनांची तपासणी केली असता ही रक्कम आढळून आली. त्यानंतर ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग असलेल्या तेलंगणा राज्याला जोडणारा या चौफुलीवर निवडणूक विभागाच्यावतीने वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - सातारा पोलीस अधिक्षकांची कारवाई; तिघांना एका वर्षासाठी तडीपार