वाशिम - लॉकडाऊन काळात दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आदिवासी कुटुंबांना आधार व्हावा म्हणून, शेलुबाजार येथील आदिवासी कुटुंबांना अन्नधान्या सह किराणा मालाचे वितरण करण्यात आले.
देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आदिवासी आयुक्तालय नाशिक अंतर्गत येणाऱ्या शेलुबाजार येथील शासकीय आश्रमशाळेत 250 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.