वाशिम - अमरावती-वाशिम महामार्गाचे काम सुरू असून, महामार्गावरील कळंबा महाली येथे कंत्राटदाराने बांधलेला तात्पुरता पूल मंगळवारी झालेल्या पावसामूळे वाहून गेला आहे. वाशिम अमरावती रस्त्याचे काम सुरू असल्याने हा तात्पुरता पूल बांधण्यात आला होता.
या पुलावरून रोज वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक होत होती. मात्र, मंगळवारी झालेल्या रिमझिम पावसातच हा पूल वाहून गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक शेलुबाजार मार्गे वाशिमकडे वळविण्यात आली आहे.