वाशिम - जिल्ह्यातील अनसिंग येथे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि आठ सदस्यांवर अपात्रतेची धडक कारवाई करण्यात आली. शासनाच्या जमिनीवर दुकाने, झोपडपट्टी, घरे आणि इतर प्रकारचे बांधकाम करण्याचे ठाव घेणे, अतिक्रमणधारकांना मुभा देणे, यासह अन्य प्रचारच्या गैरप्रकारांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
येवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत वर कारवाई झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.