ETV Bharat / state

वर्धा जिल्ह्यात सात हजार कुटुंबियांना धान्य वाटणार खासदार रामदास तडस

नागरिकांना घरात राहूनच या महामारिला लढा देण्याचे आवाहन, रामदास तडस यांनी केले आहे.

MP Ramdas Tadas
खासदार रामदास तडस
author img

By

Published : Apr 3, 2020, 8:32 AM IST

वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात हजार कुटुंबियांना धान्य वाटणार, सहा विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबिर घेत आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्याचा निर्णय वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी घेतला आहे. नागरिकांना घरात राहूनच या महामारिला लढा देण्याचे आवाहन, रामदास तडस यांनी केले आहे.

खासदार रामदास तडस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गरजूंसाठी मदतीचे हात पुढ येत आहे. खासदार रामदास रामदास तडस यांनीही वर्धा लोकसभा मतदारसंघात धान्य वाटपाचा कार्यक्रमाला सुरवात केली आहे. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील 7 हजार गरजूं कुटूंबियांना धान्य वाटप केले जाणार आहे. वर्ध्याच्या देवळी या मूळ गावातून उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. सोबतच कोरोनामुळे रक्तपुरवठ्याचा तुटवडा असल्यास रक्तदान शिबिरे सुद्धा घेणार असल्याचे खासदार रामदास यांनी सांगितले. कोरोनामुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. तरी खबरदारी म्हणून सोशल डिस्टनसिंग ठेवण्यात येत आहे. देवळीच्या इनडोअर स्टेडियममध्ये सोशल डिस्टनसिंगनुसासर ठराविक अंतर ठेवून शिबिर घेण्यात आले. तसेच रक्तदान करतांना सुद्धा रक्तदात्याना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले. रक्तदानासाठी 250 पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली.

देवळी शहरातील झोपडपट्टी परिसर जिथे लोकांचे पोट हे रोज मोलमजुरी करून भरते, अशा लोकांना गहू-तांदूळ धान्य वाटप करण्यात आले. पुढील सात दिवसात अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी आणि धामणगाव या भागात गरजूंना धान्य वाटप आणि सॅनिटायझर, मास्क देणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.