ETV Bharat / state

राज्य परिवाहन मंडळाचे अधिकारी परदेश दौऱ्यावर, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर मात्र संक्रांत...

author img

By

Published : Oct 23, 2019, 4:00 AM IST

Updated : Oct 23, 2019, 4:20 AM IST

राज्य परिवाहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षापासून दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन आणि बोनस, हे यंदा दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठपली तरी मिळाले नाहीये. वेतन न मिळण्यामागे, परिवाहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा हे कारण असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळते आहे.

State Transport Employees waiting for bonus as well as payment

वर्धा - वर्षातील सर्वात मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपला आहे. यावेळी खरेतर, सर्व घरांमध्ये खरेदीची लगबग सुरु असते. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या घरी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. ऐन दिवाळीतही या कर्मचाऱ्यांना बोनस तर मिळाला नाहीच, मात्र त्यांचे वेतनदेखील अजून मिळाले नाहीये.

राज्य परिवाहन मंडळाचे अधिकारी परदेश दौऱ्यावर, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर मात्र संक्रांत...

शुक्रवारपासून दीपावली हा सण सुरु होतोय. मागील वर्षापासून दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन आणि बोनस, हे यंदा दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठपली तरी मिळाले नाहीये. वेतन न मिळण्यामागे, परिवाहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा हे कारण असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळते आहे.

राज्य परिवाहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी हे अभ्यास दौऱ्यासाठी बेल्जिअमला गेले आहेत. दिवाळीपूर्वी हा दौरा संपून अधिकारी मायदेशी परतणार होते. मात्र, आता दिवाळीला अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे अभ्यासदौऱ्यावरून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात निर्णय न घेतल्यास, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर नक्कीच संक्रांत येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...

Intro:mh_war_bus_employ_wating_for_salary_vis_7204321

लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या 'दिवा'ळीत पेटण्याच्या प्रतीक्षेत
- मुख्य अधिकारी बेल्जियमला दौर्‍यावर

वर्धा - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या
दिवा पेटणार का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप दिवाळीपूर्वी मिळणारे बोनस आणि वेतन न मिळाल्याने दिवाळीच्या दिव्यात तेल आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारपासून दिवाळी सुरू होत न मिळलेल्या वेतनाच्या आर्थिक कोंडीत कर्मचारी अधिकारी सापडले आहे.

दिवाळी सण प्रत्येकाचा घरात दिव्यांच्या प्रकाशात साजरा केला जातो. यंदा मात्र लाल परिसाठी काम करणारे अधिकारी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहे. वेतन मिळाले तर दिवाळीत मुला बाळांची हौस होईल. शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या तोंडावर खात्यात अजून एक रुपया नसल्याने दिवाळीचा दिवा पेटवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

मागील काही वर्षांपासून दिवाळी पूर्वी मिळणारे बोनस आणि वेतन हे यंदा दिवाळी दोन दिवसांवर येऊन सुद्धा मिळाले नाही. पगाराची चर्चा न होण्यामागे अभ्यास दौऱ्याचा विषय चर्चिला जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी हे बेलजियमला अभ्यास दौऱ्यावर असल्याची चर्चा आहे. यामुळेच वेतन रखडले असल्याचे दबक्या सुरात ऐकायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी हे दिवाळीपूर्वी येणार आणि मग वेतन मिळेल अशी चर्चा होत असताना अधिकारी अभ्यासदौऱ्यावरून आल्यावर किती तातडीने विचार करतात याकडे मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Oct 23, 2019, 4:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.