वर्धा - जिल्ह्यात यंदा पावसाच्या सरसरीत मोठी तूट पडलेली आहे. मागील अठरा दिवसांच्या दांडीनंतर पावसाने आज हजेरी लावली. यावेळी विजेच्या कडकडाटसह जवळपास अर्धा तास पावसाने तुफान बॅटींग केली. रेल्वे स्टेशनवर शेडला गळती लागल्याचे पाहायला मिळाले. वर्धा शहरासह देवळी पुलगावच्या काही भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
सकाळपासून पाऊस आणि ढग यांचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे अचानक बरसलेल्या पावसाने सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. अर्धा तासात पाऊस चांगलाच बरसला.
पावसामुळे रेल्वे स्थानकाला लागली गळती -
पावसामुळे वर्धा रेल्वे स्थानकावरील भोंगळ काराभाराचा प्रवाशांना त्रास सहन करवा लागला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ दोनवरील शेड गळू लागल्याने अनेकजण पावसात भिजले. जोरदार पावसामुळे रेल्वे स्थानकाचे शेडला गळती लागल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. वास्तविक संततधार पाऊस नसतांना अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने जर फलाटावर पाणी गळती होणार असेल तर रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लाखो रुपये खर्च होत असतांना प्रवाश्याना होणारा त्रास रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करतो.