वर्धा - वारंवार सूचना देऊनही लोक ऐकायला तयार नसल्याने कोरोनाला लढा द्यायला अडचणी निर्माण होत आहे. रविवार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सोमवारी मात्र लोक सर्वसामान्य दिवसाप्रमाणे रस्त्यावर उतरलेला दिसून आले. यामुळे अखेर मुख्यमंत्र्यानी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. वारंवार सांगून लोक सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने ही कठोर पावले उचलावी लागत असल्याचे बोलून दाखवले. यासह ही संचारबंदी लोकांसाठी त्यांचा सुरक्षेसाठी आहे, असेही सांगण्यात आले.
वर्ध्यात संचारबंदी लागू होताच पोलीस प्रशासनाने रसत्यावर नाकेबंदी केली. विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यास कठोर पावले पोलीस प्रशासन उचलतील. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना दिल्या की शहरात संचारबंदी लागू झाली आहे. बाहेर फिरू नये अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप यांनी ईटीव्हीच्या माध्यमातून दिली आहे.