ETV Bharat / state

राहुल गांधींचे भाषण निव्वळ मनोरंजनासाठी टिव्हीवर दाखवले जाईल - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. ते हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

संपादीत फोटो
author img

By

Published : Apr 8, 2019, 10:38 AM IST

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. टीव्ही चॅनलवाले राहुल गांधी यांचे भाषण दाखवण्याआधी याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, राहुल जे बोलत आहेत ते सर्व काल्पनिक आहे, असा मजकूर दाखवतील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांची वर्धा येथे प्रचार सभा झाली होती. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, राहुल यांचे भाषण निव्वळ मनोरंजनाकरता टिव्हीवर दाखवले जाईल, अशाप्रकारची अवस्था आहे. तसेच काँग्रेसच्या ७२ हजार रुपयांच्या घोषणेवर त्यांनी टीका केली. कोंबड्या विकण्याचा धंदा बंद करा, असेही फडवीस म्हणाले.

यावेळी भाजप उमेदवार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, रिपाइंचे जि.प. सदस्य विजय आगलावे आदी मंचावर उपस्थित होते.

Intro:यापुढे राहुल गांधींच्या भाषणापुढे डिस्क्लेमवर दाखवले जाईल - मुख्यमंत्री फडणवीस

- काल्पनिक आहे, विश्वस ठेवू नका, आम्ही जवाबदार नसू असे डिस्क्लेमर असणार

राहूल गांधी प्रचार सभेसाठी वर्धेला येऊन गेले. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर असा समज झाला. आपण टिव्हीवर सिरीयल जाहिरात सुरू होण्यापूर्वी जशा पद्धतीने डिस्क्लेमर येते. यातील घटना काल्पनिक आहे. तसेच राहुल गांधी यांच्या भाषणापूर्वी दिसेल अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केले. ते हिंगणघाट येथे आयोजित महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

आजकाल टीव्हीवर, सिरीयल लागायच्या पहिले लिहून येत याचे पात्र काल्पनिक आहे.. याचे कथानक काल्पनिक आहे. याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. काही झाले तर आम्ही जबाबदार नाही. अशाच प्रकारच भाषण सध्या राहुल गांधी करत आहे. काही दिवसांनी राहुल गांधींचं भाषण पूर्वी टीव्ही चॅनेलवाले लिहितील, हे जे बोलतात ते काल्पनिक आहे, यामध्ये काही खरे नाही. तुमहाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. विश्वास ठेवला तर त्यामध्ये आम्हाला जिम्मेदार मानू नका. अशाप्रकारे राहुल गांधींचं भाषण निव्वळ इंटरनेटमेंटकरिता टिव्हीवर दाखवले जाईल, अशाप्रकारची अवस्था आहे असे सांगत टीका केली.

यावेळी राहुल गांधी यांच्या 72 हजार रुपये कुटून वाटणार यावरही टीका केली. कोंबड्या विकण्याचा धंदा बंद करा असेही म्हणाले.

यावेळी मंचावर उमेदवार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,सेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, रिपाइंचे जीप सदस्य विजय आगलावे आदी मंचावर उपस्थित होते.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.