ठाणे - डोंबिवली एमआयडीसीमधील एका रिसर्च सेंटरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीच्या घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली असून गॅलेक्सी फार्मासिटीकल रिसर्च सेंटर असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. या रिसर्च सेंटरमध्ये नवीन प्रोडक्ट तयार करणाऱ्याचे काम होत असतानाच कंपनीला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीत आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी घडल्या आगीच्या घटना -
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील खंबाळपाडा भागात शक्ती प्रोसिंग कंपनीला १८ डिसेंबरला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी कंपनीला आग लागताच आतील कामगार तातडीने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली होती. मात्र, आतापर्यंत या भीषण आगीत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये रिसर्च सेंटरला भीषण आग
20:18 January 27