ETV Bharat / state

ठाण्यात मिनी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यालाच अनुसरून ठाणे महापालिकेनेही १४४ कलम लागू केले आहे.

ठाण्यात मिनी लॉकडाऊन
ठाण्यात मिनी लॉकडाऊन
author img

By

Published : Apr 6, 2021, 11:48 AM IST

ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यालाच अनुसरून ठाणे महापालिकेनेही १४४ कलम लागू केले आहे. त्यानुसार,सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध आहे. या काळात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यत संचारबंदी लागू असणार आहे. विकेंडला म्हणजेच शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यत पूर्णतः बंद असेल.

नियमांचे पालन करा

शाळा- महाविद्यालये, धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद असली तरी, १० वी १२ वीच्या परिक्षार्थी व कर्मचाऱ्यांना मुभा राहील. या नियमावलीत रस्त्यावरील खाऊगल्या सुरू राहणार असून केवळ पार्सल सेवेला परवानगी आहे. मात्र, या निर्णयामुळे कारखानदार व उपहारगृह व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कारखानदारांना उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी देताना कामगारांची कोरोना चाचणी करणे, लसीकरण करणे अशा अटी घातल्या आहेत. मात्र, नियमानुसार सध्या ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे.

ठाण्यात १४४ कलम
ठाण्यात १४४ कलम

त्यामुळे सर्व कामगारांचे लसीकरण करावे की ४५ वर्षांपुढील कामगारांचे, शनिवारी आणि रविवारी संचारबंदी असल्यास कारखाना सुरू ठेवावा की नाही याबाबात नियमावलीत स्पष्टता नसल्याचे नाराजीचे सूर उमटत आहेत. तर,१० वी १२ वीसाठी वापरले जाणारे सर्व कर्मचारी/शिक्षकांनी लसीकरण करून घ्यावे किंवा कोविड निगेटीव्ह (४८ तासांपर्यत) प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

शनिवार आणि रविवारी पूर्णतः बंद...

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार शनिवार आणि रविवारी पूर्णतः बंद राहणार आहे. यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने तयारी केली असून, कोरोनाची चेन तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आले आहे. दर आठवड्याच्या दोन दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण आस्थापना बंद ठेवण्यात येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.