ETV Bharat / state

अबब...! सोसायटीच्या आवारातच डुरक्या घोणस सापाने फस्त केला भला मोठा उंदीर

author img

By

Published : Jun 6, 2021, 8:18 PM IST

Updated : Jun 6, 2021, 9:03 PM IST

जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामान बदल होऊन पावासाला सुरुवात झाली आहे. त्यातच शेती, जंगल परिसरात पावसाचे पाणी विषारी-बिन विषारी सापांच्या बिळात शिरल्याने साप बाहेर पडून भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहे. अशा प्रकारे एक डुरक्या घोणस जातीचा साप कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात असलेल्या बैतुल सोसायटीच्या आवारात भक्ष्य शोधण्यासाठी शिरला होता.

घोणस साप
घोणस साप

ठाणे - एका डुरक्या घोणस जातीच्या सापाने मोठा उंदीर फस्त केल्याने थंडगार ठिकाण असलेल्या जागेत सुस्त पडून असल्याची घटना घडली. मात्र, सर्पमित्रांनी वेळेतच त्या सपाला भक्ष्य गिळल्यानंतर पकडले. विशेष म्हणजे या सापाने मोठा उंदीर फस्त केल्याने त्याला हालचाल करणेही मुश्कील झाले होते. ही घटना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या आवारात घडली आहे.

घोणस सापाने फस्त केला भला मोठा उंदीर

रहिवाशांनी दिली सर्पमित्राला माहिती

जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामान बदल होऊन पावासाला सुरु झाली आहे. त्यातच शेती, जंगल परिसरात पावसाचे पाणी विषारी-बिन विषारी सापांच्या बिळात शिरल्याने साप बाहेर पडून भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहे. अशा प्रकारे एक डुरक्या घोणस जातीचा साप कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात असलेल्या बैतुल सोसायटीच्या आवारात भक्ष्य शोधण्यासाठी शिरला होता. त्यावेळी या सापाला मोठा उंदीर दिसल्याने त्याला गिळण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच सुमाराला सोसायटीतील एका रहिवाशाला हा साप उंदीर गिळताना दिसताच त्याने इतर रहिवाशांना सोसायटीच्या आवारात भलामोठा जाड साप शिरल्याची माहिती दिली. त्यांनतर ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता बोबे यांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत या डुरक्या घोणसने अर्धा उंदीर फस्त करून सुस्त झाला होता. त्यानंतर काही वेळाने या सापाने भक्ष्य गिळल्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी या सापाला पकडले. साप पकडल्याचे पाहून सोसायटीच्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.

'मानवीवस्तीत साप शिरल्यास घाबरू नका'

हा डुरक्या घोणस साडे तीन फुटाचा असून तो बिन विषारी असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. आता या सापाला कल्याण वन अधिकाऱ्याच्या ताब्यात देऊन त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार आहे. तसेच पावसाचे दिवस असल्याने मानवीवस्ती साप शिरल्यास घाबरू न जाता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही सर्पमित्र दत्ता यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा -सोयाबीन उत्पादन वाढ : रुंद वरंबा व सरीचे तथा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन

Last Updated : Jun 6, 2021, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.