ETV Bharat / state

World Cancer Day : कर्करोग रुग्णांत 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता - डॉ. अविनाश तळेले

author img

By

Published : Jan 31, 2022, 4:37 PM IST

Updated : Jan 31, 2022, 4:54 PM IST

4 फेब्रुवारी जगातील कर्करोग दिवस ( World Cancer Day ) म्हणून कर्करोग तज्ञ डॉ. अविनाश तळेले ( Dr. Avinash Talele ) यांचा वार्तालाप कार्यक्रम डोंबिवली पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी देशात दिवसेंदिवस कर्करोगाचे ( Cancer Increasing In India ) प्रमाण वाढत आहे. सरकारी पातळीवर याकरिता जनजागृती ( Awareness For Cancer ) होत आहे. असे असले तरी लोकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. आजच्या घडीला कर्करोग 30 ते 50 वर्ष वयाच्या ( Cancer Increasing In 30 to 50 Year Age Group People ) व्यक्तीत वाढत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

thane
thane

ठाणे - देशात दिवसेंदिवस कर्करोगाचे ( Cancer Increasing In India ) प्रमाण वाढत आहे. सरकारी पातळीवर याकरिता जनजागृती ( Awareness For Cancer ) होत आहे. असे असले तरी लोकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. आजच्या घडीला कर्करोग 30 ते 50 वर्ष वयाच्या ( Cancer Increasing In 30 to 50 Year Age Group People ) व्यक्तीत वाढत आहे. 16 वर्षांखालील वयोगटातील कर्करोगाचे प्रमाण 6 ते 8 टक्क्यांनी वाढलेले आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी जगतिक कर्करोग दिवस ( World Cancer Day ) म्हणून कर्करोग तज्ञ डॉ. अविनाश तळेले ( Dr. Avinash Talele ) यांचा वार्तालाप कार्यक्रम डोंबिवली पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित केला होता. त्यावेळी कर्करोगतज्ञ डॉ. अविनाश तळेले यांनी कर्करोग आजाराचे रुग्ण 15 टक्क्यांनी वाढतील, अशी शक्यता वजा भीती वर्तवली आहे.

महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात स्तनांचा कर्करोग -

सध्याच्या जीवनपद्धतीत बदल झाला असून प्रदूषण, सकस आहार, राहणीमान, व्यायामाकडे दुर्लक्ष आणि व्यसन यामुळे कर्करोग प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात स्तनांचा कर्करोग दिसून येत असून गर्भाशयाचा कर्करोगाचे प्रमाण समोर येत आहे. डॉ. तळेले म्हणाले, कर्करोगाचे निदान सुरुवातीला झाले, तर उपचारही लवकर सुरु होऊ शकतात. मात्र, तसे न होता रुग्ण कर्करोग तिसऱ्या स्टेजपर्यंत गेल्यानंतर उपचारांसाठी डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. या उलट इतर देशात रुग्ण लवकर तपासणी करण्यासाठी येत असल्याने कर्करोगावर लवकर उपचार सुरु होतात. नागरिकांनी कर्करोगाबाबत जागरूकता दाखवली तर देशातील कर्करोग नियंत्रणात आणू शकतो.

लठ्ठपणा दूर ठेवण्यामुळे कर्करोग टाळू शकतो -

कर्करोग विषयी नुसते सरकारने जगजागृती करून कसे चालेल, त्यासाठी नागरिकांचाही पुढाकार महत्वाचा आहे. आयसीएमआर आणि भारतीय आजारांविषयी माहिती देणाऱ्या संस्था नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फमॅटिक्स अॅड रिसर्च (बंगळुरु) च्या अभ्यासानुसार 2025 पर्यंत 12 ते 15 टक्के कर्करोग रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते. काही गाठी सध्या असतात. ओन्कोलाॅजिस्ट, रेडीओ लाॅजिस्ट आणि पॅथॅलाॅजिस्ट हे गाठीत फरक करण्यास मदत करतात. 40 वर्षांवरील सर्व महिलांनी वर्षातून एकदा स्क्रीनिंग मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे. सर्व विवाहित महिलांनी 3 वर्षांतून एकदा स्त्रीरोग तज्ञांकडून पॅप स्मीरअर तपासणी केली पाहिजे. सर्व तरुणींनी एचपीव्ही व्हॅसीन घेतले पाहिजे. त्यामुळे एचपीव्ही इन्फेशनमुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. रोज व्यायाम करून लठ्ठपणा दूर ठेवण्यामुळे 15 ते 20 टक्के छातीचे व आतड्यांचे कर्करोग टाळू शकतो.

या गोष्टीमुळे कर्करोग वाढू शकतात -

सर्व तरुण व लहान मुलांना तंबाखू व धुम्रपानाचे दुष्परिणामांची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे मुख कर्करोग कमी होतील. वाढलेले बैठे काम, धुम्रपान, अन्न पदार्थांमध्ये वाढलेले रासायनिक व कर्करोगाला पोषक पदार्थ, कीटकनाशकांचा वापर, अल्कोटिव्ह, प्रोसेस फूड व फास्ट फुडचे वाढलेले प्रमाण, या गोष्टींमुळे कर्करोग वाढू शकतात. यावेळी रेडीओलॉजिस्ट तज्ञ डॉ. रौनकलक्ष्मी शिरसाट उपस्थित होत्या.

हेही वाचा - Union Budget 2022 : कसा तयार होतो दर वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प? जाणून घ्या विशेष लेखात...

Last Updated : Jan 31, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.