ETV Bharat / state

दुर्देवी..! वीजेचा धक्का लागून २६ वर्षीय वायरमनचा मृत्यू

मंगळवेढ्यात विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बिलाल अब्दुल कादर शेख असे २६ वर्षीय मृत वायरमनचे नाव आहे.

Wireman died on the spot due to electric shock In Mangalwedha
दुर्देवी..! वीजेचा धक्का लागून २६ वर्षीय वायरमनचा मृत्यू
author img

By

Published : Oct 27, 2020, 9:19 AM IST

पंढरपूर - विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ परिसरात सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिलाल अब्दुल कादर शेख ( वय २६ रा. लवंगी ता. मंगळवेढा) असे मृत वायरमनचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल यांच्याकडे मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, मुरलीधर चौक आदी भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरू होते. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते विजेच्या खांबावर चढून काम करत होते. तेव्हा अचानक विद्युत पुरवठा सुरूळीत झाला. काही कळायच्या आत त्यांना विजेचा झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - कमी दराने सोनं देण्याच्या बहाण्याने लुटले... दीड लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड!

हेही वाचा - आजी-माजी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा राडा; निवृत्त निरीक्षक महिलेने घेतला चावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.