ETV Bharat / state

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 12 हजार विडी कामगार महिलांचा मोर्चा

सोलापूर सह राज्यातील विडी विक्रीवर बंदी आणली तर लाखो विडी कामगार महिला आणि पुरुषांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे माकप नेते आडम यांच्या नेतृत्वाखाली विडी विक्रीवर बंदी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

कामगार महिलांचा विराट मोर्चा
कामगार महिलांचा विराट मोर्चा
author img

By

Published : Jun 23, 2021, 2:14 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी सुरू असून राज्य सरकारने हायकोर्टात सकारात्मक बाजू मांडावी, या मागणीसाठी सोलापुरातील विडी कामगार महिला-पुरूष आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील 12 ते 15 हजार विडी कामगार महिलांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

विडी कामगार महिलांचा विराट मोर्चा

धूम्रपानामुळे कोरोना होण्याचा धोका

धुम्रपानामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक आहे, असा तर्क लावून एका याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी, अशी याचिका दाखल केली. त्यामुळे विडी कामगार महिला-पुरूष आक्रमक झाले आहेत. सोलापूर सह राज्यातील विडी विक्रीवर बंदी आणली तर लाखो विडी कामगार महिला आणि पुरुषांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने विडी कामगारांबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी विडी कामगारांनी केली आहे. त्यासाठी सोलापुरातील विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या 12 ते 15 हजार महिला-पुरुषांनी माकप नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले आहे.

विडी कामगार आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

माकप नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने महिला विडी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. पण या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. अतिशय दाटीवाटीने महिला रस्त्यावर बसल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

हेही वाचा - केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी; नाना पटोलेंची जळगावच्या फैजपूरात घणाघाती टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.